टॉयलेटमध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे स्मार्टपणाचे लक्षण नाही, वाचा आणि धोका ओळखा

2410 0

स्मार्टफोनची आता इतकी सवय जडली आहे की पाच मिनिट जरी स्मार्टफोन जवळ नसला की अस्वस्थ व्हायला होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन शिवाय कुणाला जगता येत नाही. घरात स्मार्टफोन वापरणे एकवेळ समजून घेता येईल, पण काहीजण टॉयलेटमध्ये सुद्धा स्मार्टफोन घेऊन जातात. पण असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. विशेषतः पुरुषांनी फोन घेऊन टॉयलेटमध्ये जाऊ नये असे डॉक्टरांचे मत आहे.

या संदर्भात इंडियाना विद्यापीठाच्या आरोग्य विभागातल्या युरोलॉजिस्ट डॉ. हेलन बर्नी यांनी माहिती दिली. डॉ. बर्नी यांनी सांगितलं, की `युरिनच्या थेंबांमध्ये बॅक्टेरिया अर्थात जिवाणू असतात. हे थेंब अनेक दिवस शौचालय आणि सार्वजनिक शौचालयात राहतात. युरिनचे थेंब तीन फुटांपर्यंत पोहोचू शकतात, असं अनेक संशोधनातून समोर आले आहे. फ्लशिंगच्या वेळी, युरिनचे थेंब सहा फुटांपर्यंत जाऊ शकतात. अशा स्थितीत हे थेंब फोनपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.

मल-मूत्रामध्ये अनेक प्रकारचे जिवाणू आणि विषाणू असू शकतात. जेव्हा टॉयलेटमध्ये फ्लश करता तेव्हा जिवाणू पसरतात. युरिनल फ्लश केल्याने 5.5 सेकंदांत 57 टक्के सूक्ष्म जीवाणू संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात, असं फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या अभ्यासात आढळून आलं आहे. हे बरेच दिवस जिवंत राहू शकतात आणि यामुळे संबंधित व्यक्ती आजारी पडू शकते.`

`डेली मेल`च्या वृत्तानुसार, `नॉर्ड व्हिपीएन`ने 2021मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात 65 टक्के लोक टॉयलेटमध्ये फोनचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात 9800 प्रौढ व्यक्तींपैकी 65 टक्के व्यक्ती टॉयलेटमध्ये स्मार्टफोनचा वापर करतात, असं दिसून आलं. फोन दुसऱ्या हातात धरल्याने जंतूंचा प्रसार कमी होईल आणि जंतू डिव्हाइसपासून दूर राहतील असा एक सामान्य समज आहे; पण हा समज चुकीचा आहे.

डॉ. बर्नी म्हणाल्या, की, `तुम्ही स्वच्छ आहात असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही फक्त स्वतःच्या शरीराला स्पर्श करत असाल किंवा युरिनलमध्ये फ्लशदेखील करत नसलात, तरी बरेच ठिकाणी बॅक स्प्लॅश असतात, हे ध्यानात ठेवावं.` अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक शौचालयं बऱ्याचदा अस्वच्छ असतात.

त्यामुळे ते जिवाणूंचे हॉटस्पॉट असतात. या ठिकाणी कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तर हातावर धोकादायक जंतू आणि जिवाणू बसतात. दाराला स्पर्श केला जातो, बाथरूममधल्या फ्लशचा वापर केला जातो. काही वेळा अगदी भितींलाही स्पर्श होतो. अशा वेळी नकळत जिवाणू संसर्ग होऊ शकतो. ही जागा ई-कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, हिपॅटायटिस ए आणि ई यांसारखे जिवाणू आणि विषाणूंच्या प्रजननासाठी योग्य असते. यामुळे जीवघेणा डायरिया, ताप यासारखे आजार होऊ शकतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!