भंडाऱ्यात शेतशिवारात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत

469 0

भंडारा- भंडारा येथून 6 किलोमीटर अंतरावरील एका शेतशिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या डोडमाझरी गटातील एका खासगी शेतशिवारात शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

रुद्र बी २ असे मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाची ओळख आहे. भंडारा- कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भिलेवाडा येथून जवळच असलेल्या पलाडी शेतशिवारात ही घटना उघडकीस आली. अशोक दसाराम भोंगाडे यांच्या गट क्रमांक 42 मधून वाहणाऱ्या नाल्यालगत एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दुपारी तीन वाजताच्या सुमारास लक्षात आली. याची माहिती ग्रामस्थांनी तातडीने भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांना दिली.

माहिती मिळताच राजूरकर हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी प्रथमदर्शनी वाघाच्या तोंडातून रक्त निघाले दिसून आले, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून सदर वाघ मार्गक्रमण करत असताना कदाचित एखाद्या वाहनाला त्याची धडक बसली असावी आणि त्यात तो जखमी होऊन मृत पावला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळ परिसर कोका अभयारण्यालगत असल्याने हा वन्य प्राण्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. घटनास्थळी उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, कारधाचे ठाणेदार राजेश थोरात, क्षेत्र सहाय्यक आय. एम. सय्यद, बिटरक्षक ए. एन. नरडांगे, क्षेत्र सहायक नागदेवे, वनकर्मचारी सचिन नरड यांच्यासह वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, मृत वाघाच्या शवविच्छेदनासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ गुणवंत भडके हे आपल्या पथकासह पोहोचले

Share This News

Related Post

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड; वयाच्या 88 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - March 18, 2023 0
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील…
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit : महाराट्रातील सत्ता नाट्यावर तेजस्विनी पंडितने केलेले ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये आज मोठी फूट पडली आहे. आज अजित…

फाल्गुन महिना 2023 : हा मराठी महिना आहे विशेष, फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकांना मिळतो विशेष लाभ

Posted by - February 6, 2023 0
फाल्गुन महिना 2023 : हिंदू कॅलेंडरचा शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुन महिना आजपासून म्हणजेच 06 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. फाल्गुन महिन्यात…
Arrest

पुणे रेल्वे स्थानकावर बॉंब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक

Posted by - May 5, 2022 0
पुणे – नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉंब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *