Breaking News

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

232 0

लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल दरम्यान होणार आहेत.

देशातील सुमारे आठ हजार मुला-मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली असून, प्रथमच मुली देखील या प्रशिक्षण संस्थेत दाखल होणार आहेत. या आठ हजार पैकी सुमारे एक हजार मुलींनी लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. म्हणजेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सुमारे 12 टक्के मुली आहेत.

मुलींसाठी नव्या संधी

* बारावीनंतर लष्करात जाण्याचा नवा पर्याय
* तिन्ही दलांमध्ये अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण
* बारावीत शिक्षण घेत असतानाच परीक्षा देता येणार
* भारतीय लष्करात महिलांची संख्या वाढणार
* कायमस्वरूपी आयोगा अंतर्गत सेवा करण्याची संधी

आरआयएमसी मध्येही मुलींना प्रवेश

‘एनडीए’ प्रमाणे मुलींना आता डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आदेश दिले आहेत. त्यामुळे हळूहळू महिलांना लष्कराच्या विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये दाखल होण्याची संधी मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide