स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी, महाराष्ट्रात गाजलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज

588 0

मुंबई- एकेकाळी महाराष्ट्राला हादरवून सोडणारा स्टॅम्प घोटाळा अनेकांना माहित आहे. एक फळ विक्रेता ते स्टॅम्प घोटाळ्याचा मास्टरमाइंड असा प्रवास असलेल्या अब्दुल करीम तेलगी याच्या जीवनावर आणि घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ च्या यशानंतर देशात दुसरा मोठा घोटाळा सीरीज रूपात बघायला मिळणार आहे. अप्लॉज एन्टरटेन्मेंट यांनी आपल्या स्कॅन फ्रंचायजी स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी (Scam 2003 : The Telgi Story) ची घोषणा केली आहे.

अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेत दिसणार आहे अनुभवी थिएटर आर्टिस्ट गगन देव रियार. कर्नाटकच्या खानापूरमध्ये जन्मलेला एक फळ विक्रेता अब्दुल करीम तेलगी पुढे एका मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कसा झाला याचा प्रवास या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

Share This News
error: Content is protected !!