शमशेरा या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी ‘शमशेरा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे.
शमशेरा हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. ‘शमशेरा’ चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये ?
ट्रेलरच्या सुरुवातीला 1871 असं लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर ‘आझादी तुम्हे कोई देता नही’, ‘ये कहानी है शमशेरा की’ हे डायलॉग्स ऐकू येतात. ट्रेलरमध्ये रणबीरची एन्ट्री होते. त्यानंतर वाणी कपूर ही एका डान्सरच्या भूमिकेत दिसते. वाणी आणि रणबीरच्या भूमिकेनंतर संजय दत्तच्या शुद्ध सिंह या भूमिका दिसतात. चित्रपटामध्ये अभिनेता रोनित रॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.