bullet

पुण्यात नवरदेवाला पाठीमागे बसवून नवरीची बुलेटवरून रॉयल एन्ट्री; वऱ्हाडी बघतच राहिले

2504 0

पुणे : तुम्ही सगळ्यांनी सैराट चित्रपट पहिलाच असेल. त्यामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपल्या लाडक्या आर्चीने बुलेटवरून एन्ट्री घेतली होती. त्यानंतर मुलींमध्ये बुलेट चालवण्याची क्रेझ पाहायला मिळाली. सध्या एका नवरीचा तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात गाजत आहे. यामध्ये नवरीने चक्क नवर देवाला घेऊन लग्नमंडपात रॉयल एन्ट्री घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये नववधूने बुलेटवर नवऱ्याला पाठीमागे बसवून लग्न मंडपात ग्रँड एन्ट्री केली आहे. यावेळी नवरीने मराठमोळा साज शृंगार केला होता.

या नववधूला सर्व वाहने चालवता येत असल्याने शेतकरी बापाने लेकीची हौस पुर्ण करत तिला लग्नात भेट म्हणून चक्क एक कार, एक बुलेट आणि दुचाकी दिली आहे. एका शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली यामुळे मुलगी आणि बाप यांच्या नात्यातील जिव्हाळा यावेळी दिसून आला. या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!