पुणे विद्यापीठाच्या फी शुल्कात मोठी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

452 0

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही फी वाढ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आधीच महागाईमुळे, शैक्षणिक खर्च वाढला आहे. त्यामुळे ही शुल्कवाढ मागे घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शुल्क वाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असे विद्यापीठ प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आलं आहे.

तसेच अनेक विद्यार्थ्यांना या फी वाढीमुळे परीक्षा ही देता येणार नसल्याचं म्हटलं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय विद्यापीठाने मागे घ्यावा अशी विनंती विद्यार्थी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!