रिकाम्या पोटी डाळिंब खाणे फायदेशीर ! जाणून घ्या कारणे

456 0

आरोग्याच्या बाबतीत आता प्रत्येकजण खूप काळजी घेताना दिसतो. आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असते. असे डॉक्टर सांगतात. म्हणून बरेच लोक फळे किंवा त्याचा ज्यूस पितात. पण ज्यूस करून पिण्यापेक्षा फळे खाणे अधिक फायदेशीर असते. कारण फळांमधूनच डायट्री फायबर आणि अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. डाळींब हे अतिशय रसदार आणि गोड फळ आहे. कधीही खाल्ले तरी ते चांगलेच असते पण रिकाम्या पोटी डाळिंब खाणे अधिक फायदेशीर असते. काय आहेत ते फायदे जाणून घेऊ या..

अ‍ंटीऑक्सीडेंट

डाळिंबामध्ये पॉलिफेनोल्स नावाचं फायटोकेमिकल्स असं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंब रोज जर रिकाम्या पोटी खाल्लं तर शरीरातील पेशांनी फ्री-रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर रोज डाळिंबाचं सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत मिळते.

किडनी तंदुरुस्त राहते

डाळिंबातील अ‍ॅंटीऑक्सीडेंट किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तेच जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब रिकाम्या पोटीच खाल्लं तर जास्त फायदा मिळेल.

शरीरातील सूज कमी होते

डाळिंबामुळे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात सूज कमी करणारे अनेक तत्व असतात. शरीरावर सूज असेल तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचं सेवन करा.

अनेक आजार राहतात दूर 

डाळिंबातील अ‍ॅंटीमाइक्रोबियल गुण याला एक प्रभावी अ‍ॅंटीबायोटिक बनवतात. ज्यामुळे संक्रमण आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला हेल्दी रहायचं असेल डाळिंबाचं सेवन नियमितपणे करा.

Share This News
error: Content is protected !!