पुणे- नुकत्याच पॉण्डेचरी येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स ऍथलेटिक्स २०२२ स्पर्धेमध्ये पुण्याच्या पल्लवी मावळे यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
त्यांनी थाळीफेकमध्ये सुवर्ण पदक, गोळाफेक आणि भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक असे तिहेरी यश प्राप्त केले आहे. पल्लवी मावळे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या राहत असलेल्या कमलासिटी सोसायटीमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.