Love

रुबीना खान कशी बनली रुबी अवस्थी? वाचा अनोखी लव्ह स्टोरी

1640 0

सध्या सगळीकडे लव्ह जिहादच्या (Love Jihad) प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यातले वातावरण सध्या लव्ह जिहादमुळे तापलेले आहे. तसेच लव्ह जिहादवरून कायदा आणण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत. मात्र उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइच जिल्ह्यातुन एक अनोखी प्रेम कहाणी (Love Story) समोर आली आहे. यामध्ये मुस्लीम धर्मातील रुबीना खानने (Rubina Khan) तिचे प्रेम मिळवण्यासाठी रुबी अवस्थी बनून शेषकुमार अवस्थी याच्याशी विवाह केला आहे. कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता रुबिना खानने शेषकुमार अवस्थीसोबत (Seshakumar Awasthi) मंदिरात सात फेरे घेऊन त्याच्याशी लग्नगाठ (Marriage) बांधली आहे. तसेच कपाळावर कुंकू लावत हिंदू धर्म स्वीकारला.

काय आहे नेमके प्रकरण?
उत्तप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील शिवपुरा येथील रहिवासी रुबिना खान आणि शेषकुमार अवस्थी यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे एकत्र येण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. यामुळे त्या दोघांनीही घरच्यांविरोधात जाऊन लग्न करण्याचे ठरवले. यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन हिंदू रितीरिवाजानुसार सात फेरे घेतले आणि लग्न केले. या घटनेमुळे रुबीनाच्या कुटुंबीयांना राग आला. त्यामुळे त्यांनी शेषकुमारवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

यानंतर पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले. यावेळी रुबीनाने कोर्टात आपला जबाब दिला. ‘न्यायाधीश साहेब, मी प्रौढ आहे. मला माझा स्वतःचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी स्वेच्छेने माझा धर्म सोडून हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे असे रुबीना म्हणाली. रुबिना खानचा जबाब ऐकल्यानंतर संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. यानंतर कोर्टाने या प्रकरणावर निर्णय देत दोघांनाही संपूर्ण सुरक्षेसह मुलाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या लग्नामुळे खूप आनंदी आहोत आणि मुस्लिम समाजाच्या मुलीला घरची सून म्हणून स्वीकारले आहे अशा प्रतिक्रिया मुलाच्या कुटुंबियांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!