नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याने सुनेवर झाडल्या गोळ्या, सुनेचा मृत्यू

719 0

ठाणे- वेळेवर सकाळचा नाश्ता दिला नाही म्हणून एका सासऱ्याने आपल्या सुनेवर बंदुकीतून गोळी झाडून खून केला. ही घटना ठाण्यात घडली. खून करून फरार झालेल्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सीमा राजेंद्र पाटील (वय 42) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुनेचे नाव असून काशिनाथ पाटील (वय 74) असे सासऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राबडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

काशिनाथ पाटील यांना दोन मुले आहेत. एकत्र कुटुंब असलेल्या या घरात काशिनाथ पाटील यांचे पत्नी आणि दोन्ही सुनांबरोबर नेहमी वाद होत असत. त्यातच ते आपल्या सुनांची बदनामी आपल्यानातेवाईकांकडे करत असत. त्यामुळे सुनेने त्यांना गुरुवारी सकाळी नाश्ता न देता फक्त चहा दिला. त्यावरून सासरा प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याने आपल्या बंदुकीतून सीमेवर गोळी झाडली. त्यानंतर सासरा घटनास्थळावरून फरार झाला.

सीमा यांच्या पोटात गोळी घुसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना धाकट्या सुनेसमोर घडली. जखमी झालेल्या सीमा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी रात्री सीमा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर फरार झालेल्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!