पिंपरी- भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती आता सुधारत असून लवकरच जगताप कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज दिली आहे
लक्ष्मण जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लक्ष्मण जगताप यांची प्रकृती अतिशय खालावल्यानंतर त्यांच्या बाबत कोणतीच माहिती जाहीर करण्यात येत नव्हती. आज आमदार महेश लांडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये महेश लांडगे म्हणतात की, लाडके लोकनेते, आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रकृती सुधारत आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. दोन ते तीन दिवसात एकदम व्यवस्थित होऊन ते डिस्चार्ज घेऊन घरी येतील. डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच बरे होतील, असे डॉक्टरांनी सांगितले, सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी घरीच थांबावे. आपले काम करावे. ज्यावेळी भाऊ व्यवस्थित होतील. त्यावेळी सगळ्यांना भेटतील ही माझी नम्र विनंती “