Sex Life

Sex Life : या ‘3’ सवयी तुमच्या सेक्स लाईफसाठी ठरू शकतात घातक

993 4

इंटीमेसी (Sex Life) अर्थात लैंगिक संबंधांमुळे जोडप्याच्या नात्यांमध्ये मजबूती येते. मात्र अश्या काही सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर (Sex Life) परिणाम होतो. त्यामुळे असा सवयी बदलणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया या 3 सवयींबद्दल ज्या दूर करणं फार गरजेचं आहे.

जास्त जंक फूड खाणं
आजकाल अनेकांचा कल जंक फूडकडे अधिक असतो. जंक फूड्स आधी आवडीने खाल्लं जातं मग त्याचं रुपांतर सवयीमध्ये होतं. जंक फूड खाल्ल्याने कार्ब्स, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट शरीरात जमा होऊ लागतात. त्यामुळे रक्तप्रवाह खूप मंद होतो. ज्यामुळे तुम्ही इंटीमसीदरम्यान चांगली कामगिरी करू शकत नाही.

अतिप्रमाणात चिंता
सध्याच्या काळात अनेकजणांना चिंता सतावत असते. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होतो याची तुम्हाला कल्पना आहे का. यामुळे तुमचे लैंगिक जीवनही विस्कळीत होते. तणावामुळे सेक्स करण्याची इच्छा कमकुवत होते. त्यामुळे तुम्हाला ताणतणापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल.

मिठाचं प्रमाण कमी
काही लोकांना आहारात अधिक मीठ घेण्याची सवय असते. मात्र तुमची ही सवय तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम करते हे तुम्हाला माहितीये का? जास्त प्रमाणात मीठाच्या सेवनाने ब्लड प्रेशर वाढतं, ज्यामुळे लिबिडो कमी होतो.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!