ऑफिसमध्येही घेता येणार वामकुक्षी…! जपानमध्ये बनवलं आहे ‘नॅप बॉक्स’…

130 0

ऑफिसमध्ये वामकुक्षी हे वाचल्यानंतर अनेकांनी कान नक्कीच टवकारले असतील.  कारण ऑफिसमध्ये सकाळपासून काम केल्यानंतर दुपारच्या वेळी जेवण झाल्यावर डोळ्यावर नक्कीच झापड येत असते . मग अशावेळी कॉफी , एखादी छोटीशी चक्कर , डोळ्यावर पाणी मारणे असे अनेक प्रकार तुम्ही करून पाहिले असतील . मग अशावेळी जर ऑफिसमध्येच एखादी डुलकी घेता आली तर ? किती छान होईल , असं तुमच्या मनातही आलं असणारच… !

पण थांबा ही बातमी भारतासाठी नाहीये.  त्यामुळे तुम्हाला ही इच्छा सध्या तरी पूर्ण करता येणार नाही . तरी ही बातमी आहे जपानमधली , कारण जपान मधील लोक हे अधिक तास काम करतात . मोठ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घटकाभर विश्रांती घेऊन पुन्हा कामांमध्ये वेग देता यावा , यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे.

डुलकी काढण्यासाठी 'नॅप बॉक्स'! | पुढारी

यासाठी जपानमधील दोन फर्निचर कंपन्यांनी मॅप बॉक्स तयार केला आहे. यामध्ये मोठ्या शिफ्टचे कर्मचारी आराम करू शकतात, परंतु यासाठी एक विचित्र अट देखील घालण्यात आली आहे . तर ही अट आहे की, तुम्हाला पाठ टेकून झोपता येणार नाहीये.  तुम्हाला या बॉक्समध्ये उभच राहून झोपावे लागणारे . आता खरंतर उभं राहून या लोकांना कितपत आराम मिळेल हे सांगता येत नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!