Sex Hormones

Sex Hormones : पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स कमी झाले आहेत ‘हे’ कसे समजते?

451 0

प्रत्येकाच्या शरीरात सेक्स हार्मोन्स (Sex Hormones) असतात. जर शरीरात यांची कमी झाली की त्याची लक्षणं देखील दिसून येतात. पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स (Sex Hormones) कमी झाले, की कोणती लक्षणं दिसून येतात, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जसं-जसं पुरुषाचं वय वाढतं, त्यानुसार पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. टेस्टोस्टेरॉन हार्मोन याला सेक्स हार्मोन देखील म्हणतात, ते पुरुषांच्या शरीरात तयार होतं. या हार्मोनमुळे पुरुषांमध्ये सेक्सची इच्छा वाढते तसंच कमी देखील होते. त्यामुळे पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये घट झाली की त्याचे परिणाम शरीरावरही होऊ लागतो. आता ती कोणती लक्षणे आहेत जाणून घेवुयात…

सतत मूड बदलणं
जेव्हा पुरुषांच्या शरीरामध्ये सेक्स हार्मोनची कमी होते तेव्हा त्यांचा मूड बदलतो. या सेक्स हार्मोनच्या कमीमुळे पुरुषांमध्ये भावनिक बदल होऊ लागतात. यावेळी मूड बदलू शकतो. जेव्हा सेक्स हार्मोन शरीरातून कमी होऊ त्यावेळी पुरुषांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

सेक्सची इच्छा कमी होणं
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमी निर्माण झाली की त्यांना सेक्स (Sex Hormones) करण्याची इच्छा देखील होत नाही. या हार्मोनच्या कमतरतेमुळे पुरुष सेक्सपासून अनेकदा लांब राहणं देखील पसंत करतात. अशामुळे नात्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. सेक्सची इच्छा नसल्याने पुरुष यामुळे सेक्सला नकार देतात.

ताकद कमी असल्यासारखं जाणवणं
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता निर्माण झाली की पुरुषांना ताकद नसल्यासारखं वाटतं. अशा स्थितीत पुरुषांच्या शरीरावर स्नायूंवर मोठा परिणाम होतो. कारण या परिस्थितीमध्ये पुरुषांच्या शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात.

Share This News
error: Content is protected !!