पोलिसांची वेळीच मिळाली मदत ; रेल्वेत प्रसववेदना झालेल्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म (व्हिडिओ)

165 0

सोलापूर- वाडी- सोलापूर डेमू रेल्वे, वेळ सकाळी 10 वाजताची. ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकात येताच या गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसववेदना सुरु झाल्या. पतीने मदतीसाठी हाक देताच रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन स्ट्रेचरच्या साहाय्याने रेल्वे स्टेशनवरून महिलेला रुग्णवाहिकेत पोहंचवले. वेळीच मदत मिळाल्यामुळे या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही घटना शुक्रवारी (दि. 28) घडली. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झालीय.

वाडी – सोलापूर डेमू रेल्वे शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास सोलापूर स्थानकावर दाखल झाली. कलबुर्गी रेल्वे स्थानाकातून भाग्यश्री जमादार या गर्भवती महिला त्यांच्या परिवारासह सोलापूरकडे प्रवास करीत होत्या. दरम्यान, रेल्वे फलाट क्रमांक पाचवर येऊन थांबते न थांबते तोच त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या..
त्यामुळे त्यांच्या पतीने मदतीसाठी धावपळ सुरु केली,

या महिलेचा आवाज लोहमार्ग पोलिसांनी ऐकताच प्रसंगावधान राखून पोलिसांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने रेल्वे स्टेशनवरून महिलेला रुग्णवाहिकेत पोहंचवले आणि त्यानंतर त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिलेचा तर जीव वाचलाच अन् त्या महिलेने गोड मुलीला ही जन्म दिला.

सध्या महिला आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रल्हाद चव्हाण, दीपक साळवी, विशाल कुलकर्णी आणि बालाजी नाबदे असं या चार कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झालीय. पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीच सोलापुरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This News
error: Content is protected !!