‘कच्चा बादाम’ गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या गायकाचा अपघात, गंभीर जखमी

451 0

पश्चिम बंगाल- ‘कच्चा बादाम’ फेम गायकाचा अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला आहे. ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. भुबनने नुकतीच एक कार खरेदी केली. भुबन कार चालवायला शिकत होता. तेवढ्यातच हा अपघात झाला. भुबन बड्याकर पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचं काम करतो. शेंगदाणे विकता विकता तो कच्चा बादाम हे गाणं गायचा. सोशल मीडियावर हे गाणं लोकप्रिय होऊन व्हायरल झालं. ज्यानंतर भुबन बड्याकर लोकप्रिय झाला.

भुबन बड्याकर हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. दुबराजपूर ब्लॉक अंतर्गत कुरलजुरी गावात त्याचं घर आहे. भुबन याच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे. भुबन वाड्याकर यांची ख्याती म्हणजे आता ते कुठेही गेले की लोकांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा असतो. भुवनच्या ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर लाखो यूजर्सनी रील्स केले आहेत. सध्या दुखापत जास्त झाली असल्याने प्रकृती चिंताजनक आहे.

Share This News
error: Content is protected !!