अभिनेत्री ईशा अग्रवालची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; झोलझाल चित्रपटाची घोषणा

360 0

मराठी सिनेसृष्टीत आता तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री ईशा अग्रवाल झळकणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘झोलझाल’ मध्ये अभिनेत्री ईशा अग्रवाल पाहायला मिळणार आहे.

या मराठी चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, उदय नेने, उदय टिकेकर असे अनेक कलाकार आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. झोलझाल हा चित्रपट 1जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमार मानस दास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना अग्रवाल यांनी निर्मिती केली आहे. ईशा अग्रवाल जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. मिस इंडिया एक्झीक्युइस्ट 2015 मध्ये सुद्धा विजेती ठरली होती. ईशा अग्रवालने ‘मिस ब्यूटी टॉप आफ द वर्ल्ड’ हा किताब पटकावला आहे.
हिंदी चित्रपट आणि तमिळमध्ये झळकल्यानंतर मराठी सिनेमात दिसणार आहे.

Share This News
error: Content is protected !!