मुंबई- माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकांचे वेध लागले आहेत. 20 जून रोजी विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत असून या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख चार पक्षांनी बुधवारी आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी भाजपने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव नसल्याने खोत यांना डावलल्याची चर्चा सुरू होती.
सदाभाऊ खोत यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना पाठिंबा देखील जाहीर केला होता. मात्र सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
20 जून रोजी विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत असून या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुक अटी-तटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. खोत यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना पाठिंबा देखील जाहीर केला होता.
मात्र सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र भाजपचा पाठिंबा असलेले खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल मॆळा.
अशी होणार निवडणूक
भाजपकडे हक्काची 113 मते आहेत. त्यामुळे 27 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या 22 मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर, काँग्रेसची 44 मते असून 27 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला 10 मतांची गरज भासणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा संधी दिली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे, भाजप प्रवक्ते श्रीकांत भारतीय असे एकूण पाच उमेदवार दिले आहेत.
शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर, काॅंग्रेसकडून मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे. तर, त्यांच्या जोडीला अनुभवी असे एकनाथ खडसे यांना विधान परिषदेत पाठविण्यात आले आहे.