हिंदू पौराणिक कथेनुसार, जन्माष्टमीला भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान कृष्ण (Lord Krishna) यांचा जन्म होतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणारा सण म्हणजे जन्माष्टमी. लोकांचा असा विश्वास आहे की भगवान कृष्णाच्या प्रत्येक कृतीला काही अर्थ, संदेश आणि महत्त्व असते जे आपले जीवन समृद्ध करू शकते. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर आपण असे 7 संदेश जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनातील आर्थिक संकट दूर करून तुम्हाला सकारात्मक जीवन जगण्याची दिशा दाखवतील.
1) तुमचे ध्येय ठरवा
कुरुक्षेत्राच्या युद्धादरम्यान, कृष्णाने पांडवांना त्यांच्या ध्येयापासून विचलित होऊ दिले नाही, सत्य असत्य, धर्म आधर्म यातला फरक समजावून सांगितला. त्याचप्रमाणे तुम्ही स्वत:साठी आर्थिक ध्येय निश्चित करून त्यानुसार गुंतवणूक करा.
2) ध्येय गाठा
भगवान कृष्ण ‘लोणी’ चोरण्यासाठी प्रसिद्ध होते. ‘दहीहंडी’ साजरी करताना भारताच्या काही भागात अजूनही लोण्याची घागर भरण्याची परंपरा आहे. मात्र, लोणी चोरण्यामागे एक संदेश दडलेला आहे. हंडी गाठण्यासाठी उंची गाठणे आवश्यक आहे. त्यामुळे असा पर्याय निवडा, जो तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल, जेणेकरून ध्येय सहज गाठता येईल.
3) लोभी होऊ नका
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, जसा अग्नी धुराने झाकलेला असतो आणि आरसा धुळीने झाकलेला असतो, त्याचप्रमाणे ज्ञान इच्छेने झाकलेले असते. म्हणून शहाणे व्हा आणि तुमच्या भावनांना, विशेषतः भीती आणि लोभ यांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका.
4) भावनांवर नियंत्रण ठेवा
कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन, वडीलधारी, गुरु आणि मित्र यांच्याशी लढण्याच्या भावनेमुळे गोंधळून जातो. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला समजावले. अर्जुनप्रमाणेच, गुंतवणूकदार कधीकधी त्यांच्या गुंतवणुकीबद्दल भावनिक होतात ज्यामुळे त्यांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येत नाही. अशावेळी भावूक होवून गुंतवणूक करू नका.
5) अनावश्यक धोका टाळा
युद्धाच्या वेळी अर्जुन आणि कर्ण हे समान योद्धे होते. कर्णाकडे भगवान इंद्राचे दैवी शस्त्र होते. पण त्याचा प्रतिकार करण्यासाठी अर्जुनाकडे असे कोणतेही शस्त्र नव्हते. त्यामुळे कृष्णाने अर्जुनाला कर्णापासून वाचवले. आर्थिक सल्लागाराच्या मदतीने तुम्हीही असा धोका टाळू शकता.
6) नवीन ठिकाणी गुंतवणूक करा
जीवनचक्र समजावून सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो.” त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा आढावा घ्यावा आणि तोट्यात असलेल्या भागातून पैसे काढून नवीन ठिकाणी गुंतवावे.
7) तुमचे आर्थिक ज्ञान वाढवा
कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी अर्जुनासाठी भगवान कृष्णाने जसा चांगला सारथी घेतला होता तसाच तुमच्याकडे चांगला सारथी असला पाहिजे. आर्थिक माहिती देण्यासाठी मार्केटमध्ये अनेक सारथी उपस्थित आहेत. पण तुम्हाला त्यातील एक चांगला आणि विश्वासू सारथी निवडून आपले आर्थिक ज्ञान वाढवावे लागेल.
Comments are closed.