गणपती बाप्पाच्या आगमनावेळी शंख, नारळासह या 4 गोष्टी घरी आणा ; घरावर राहील श्रीगणेशाची कृपादृष्टी

290 4

मुंबई : गणपती बाप्पांचं आगमन 31 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीचा सण गणेश जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या काळात लोक ढोल-ताशांच्या गजरात आपल्या बाप्पाला धुमधडाक्यात घरात आणतात. संपूर्ण गणेश उत्सवाच्या दिवसांमध्ये बाप्पाचे नाव चहूबाजूंनी ऐकू येते.

भगवान गणपती ही बुद्धी आणि मंगलकार्याची देवता आहे. त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. बाप्पा जेथे विराजमान होतात, तिथे सुख-समृद्धी कायम असते, असे म्हणतात. मान्यतेनुसार यंदा गणपती बाप्पा अत्यंत शुभ योगात येत आहेत. पंचांगानुसार भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी संपणार आहे. उदया तिथीनुसार, 31 ऑगस्टपासून गणेश उत्सव सुरू करण्याचा विचार केला जाईल.

शंख, नारळ यासह या 4 वस्तू घरी आणा –

-या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते. यामुळे श्रीगणेश आणि लक्ष्मीजी प्रसन्न होतात. कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. लक्ष्मी माता शंखात निवास करते. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात शंख शिंपले आणल्याने वास्तुदोष दूर होतात. उत्पन्न वाढते. दररोजच्या आरतीनंतर ते वाजवल्याने सकारात्मक शक्ती प्रसारित होतात.

See the source image

– कुबेर देवता संपत्तीचे स्वामी आहे. गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी धनदेवता असलेल्या कुब्रे यांची मूर्ती घरात ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. असे केल्याने गरिबी दूर होते. कुबेराची मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते.

See the source image

– धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी एकक्षी नारळ घरी आणणे शुभ मानले जाते. पैशाची कमतरता कधीच भासत नाही. घरी आणल्यानंतर रोज त्याची पूजा करावी. यामुळे नकारात्मकता दूर होते.

– धार्मिक दृष्टीकोनातून गणेशाची नृत्य मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. गणेशाची ही मूर्ती घराच्या मुख्य द्वारावर लावल्याने घरात कधीही नकारात्मक शक्ती येत नाहीत, असे मानले जाते.

See the source image

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!