हृदय पिळवटून टाकणारी घटना : लग्नाची हळद सुटली ना मेहेंदी; लग्नाच्या पाचच दिवसात नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू

588 0

बारामती : आयुष्यातील संस्मरणीय प्रसंग असतो तो म्हणजे लग्न…! दोन अगदी वेगळ्या वातावरणात लहानाचे मोठे झालेले दोघेजण पुढचे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत जगण्याचे वचन देतात. बारामती मधील माळेगांव बुद्रुक मध्ये राहणार २५ वर्षीय सचिन आणि परभणीची हर्षदा यांच लग्न १९ नोव्हेंबर २०२२ ला झाला. धुमधाक्यात लग्नाचे सगळे विधी आणि रीतिरिवाज पूर्ण झाले. पण बुधवारी मध्यरात्री सचिनला अचानक अस्वस्थ वाटू लागले.

कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आयुष्याची खरी सुरुवात झाली होती पण नियतीला वेगळेच मान्य होते. रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सचिनला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत घोषित केले. हा धक्का कुटुंबियांना तर होताच, पण हर्षदाच्या हातावरची मेहेंदीचा रंग देखील अद्याप सुटला नव्हता अशात या नववधूवर हि वेळ आली.

आज हि बातमी संपूर्ण गावात पसरल्यानंतर संपूर्ण गावाने देखील शोक व्यक्त केला. लग्नासाठी उभारलेल्या मंडपातून सचिनची अंतयात्रा काढावी त्यामुळे कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!