Heart Attack

Heart Attack : हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये नेमका फरक काय?

586 0

दिवसेंदिवस आपली बदलती जीवनशैली वाढता ताण तणाव आणि उलट सुलट आहार त्यामुळे आजारही बळावले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे (Heart Attack) प्रमाण वाढले असून. त्यात जीव जाण्याचं प्रमाण सुद्धा अधिक आहे. या आधी फक्त वृद्धांना किंवा आजारी असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक यायचा पण आता मात्र तरुणांमध्ये याच प्रमाण अधिक वाढले आहे.

प्रति 100,000 लोकांमागे हृदयविकाराचा झटका येण्याचे वय आणि टक्का
वय            टक्का
20- 29      2.1
30– 39     16.9
40- 49      97.6

पण आता हार्ट अटॅकसह (Heart Attack) पॅनिक अटॅकची समस्याही वाढू लागली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हार्ट अटॅक जितका धोकादायक असतो तितकाच पॅनिक अटॅकही धोकादायक आहे. अनेकदा लोकांना हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यामधील फरक कळत नाही. ज्यामुळे त्या रुग्णाला आपल्याला नेमकं काय होत आहे हे समजत नाही. जर तुम्हालाही हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यातील फरक ओळखताना त्रास होत असेल तर मग समजून घ्या…

हार्ट अटॅक म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो.अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.

हार्ट अटॅकची लक्षणे काय असतात?
छाती दुखणे, गुदमरल्यासारखे वाटणे, अस्वस्थत वाटणे, ही हार्ट अटॅकची काही लक्षणे असू शकतात.
थकवा जाणवणे, धाप लागणे, अचानक हार्टबीट्स वाढणे, ही सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.
हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा हार्टचा आजार असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांनी नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे

पॅनिक अटॅक म्हणजे काय?
तज्ञांच्या मते, पॅनीक अटॅक हा एक प्रकारची चिंता आहे, जी खूप गंभीर असण्यासोबतच अचानक विकसित होते. पॅनीक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वाढणे, तसेच श्वासोच्छवासाचा त्रास, डोके फिरणे आणि शरीर थरथरणे इत्यादी लक्षणे विकसित होतात.

समान लक्षणं?
रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये दोन्ही ठिकाणी छातीत दुखणं, श्वास घेताना त्रास आणि घाम येणं अशी लक्षणं दिसतात.

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये अंतर
ब्रिटनच्या आरोग्य तज्ज्ञांनी आपल्या रिपोर्टमध्ये दोन्हीमधील मुख्य अंतर सांगितलं आहे की, पॅनिक अटॅक कोणत्याही वेळी येऊ शकतो. मग तुम्ही आराम करत असा किंवा झोपलेले असा. हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा आपण भरपूर काम करत असतो. हार्ट अटॅक फक्त छातीपर्यंत थांबत नाही, तर अनेक लोकांच्या हात आणि मानेपर्यंतही पोहोचतो.

पॅनिक अटॅक पासून स्वतःचा बचाव कसा कराल ?
तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवा. तीन सेकंद नाकातून श्वास घ्या, दोन सेकंद श्वास रोखून ठेवा आणि तीन सेकंद तोंडातून श्वास सोडा. तुम्ही या तंत्राची पुनरावृत्ती करत राहिल्याने तुम्हाला थोडे शांत वाटू लागले पाहिजे. नसल्यास, श्वास घेण्याची इतर साधी तंत्रे आहेत जी तुम्ही वापरून पाहू शकता. गरज पडल्यास योग्य तज्ञाचा सल्ला घेऊन उपचार सुरु केले पाहिजे स्वतःला सतत प्रोत्साहित केले पाहिजे. तेव्हा सकरात्मक राहा या गोष्टींमुळे डिसॉर्डरवर मात करणे शक्य होईल. यामुळे नव्यानं मोकळ्या स्वस्थ आयुष्याला सुरवात करता येईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!