तुळस भारतीय घरांतील पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळतं. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. तुळशीचं बी म्हणजेच सब्जा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे.सब्जा सेवनाचे गुणकारी फायदे जाणून घ्या.
सब्जाच्या सेवनाचे फायदे –
शरीरातील पाण्याची पातळी भरुन निघते.
शरीराला थंडावा मिळतो.
पोटात जळजळ होत असल्यास आराम मिळतो.
पित्ताचा त्रास कमी होतो.
उष्णतेचे विकार दूर होतात.
लघवीस त्रास होत असल्यास समस्या दूर होते.
मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग (युरिन इन्फेक्शनचा) दूर होतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
वजन नियंत्रणात राहते.
सब्जाचं सेवन कसं करावं ?
सब्जाच्या काही बिया घेऊन त्या पाणी,सरबत किंवा दूध यात रात्रभर भिजत घालायच्या. त्यानंतर सकाळी भिजलेल्या बियांसकट हे पाणी किंवा दूध प्यायचं. तसंच दिवसभर साध्या पाण्यात घालून या बियांचं सेवन केलं तरीदेखील चालतं. अनेकदा फालुदा करताना या बियांचा वापरक केला जातो. दरम्यान, सब्जा हा तुळशीसारखाच एक लहानसा प्रकार आहे. सब्जा कोणत्याही ठिकाणी सहज रुजतो आणि वाढतो. साधारणपणे, पंजाबमध्ये सब्जाची रोपटी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते.