कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता? WHO कडुन सावधान राहण्याचा इशारा

489 0

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर आता नवीन लाट येण्याची शक्यता आहे, सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता आहे असे सांगितले. सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंट सगळीकडे आढळून येत आहे. कोरोनाचे लसीकरण जरी झाले असले तरी ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटची लागण होताना दिसत आहे. जेवढ्या जास्त लोकांना या व्हेरिएंटचे संक्रमण होईल तेवढ्या जास्त प्रमाणात रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढेल त्यामुळं सर्व नागरिकांनी तसेच देशानं सतर्क राहण्याची गरज आहे.

काही दिवसांपासून आटोक्यात आलेली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये त्यामुळं योग्य वेळी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे असा इशारा WHO ने दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!