पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा धोका खूप असतो. यामुळे अनेकांना घसादुखीचा (Sore Throat) त्रास होतो. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे फार चान्स असतात. वातावरणातील बदल, अशुद्ध व संक्रमित पाणी, थंडी व आद्र्रता आदींमुळे पावसाळ्यात घसादुखी (Sore Throat) त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय घेणार आहोत…
गुळणी करणे
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळणी करा. यामुळे घशातील सूज, वेदना कमी होण्यास मदत होते. कमीत कमी दिवसातून 2 वेळा गुळणी करा.
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा चूर्ण घशातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ते घ्या.
मध आणि आद्रक
मध आणि आल्याचा रस मिसळून चाटण तयार करून त्या सेवन करावे. त्यामुळे आपल्याला घसादुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
बदाम तेल
बदाम तेल हलके गरम करून हलक्या हातांनी घशावर मसाज केल्याने घशाची खवखव कमी होण्यास मदत होते.
तुळशीचा चहा
तुळशीच्या पानांपासून बनवलेल्या चहामुळे घसादुखी कमी होण्यास मदत होते.
हळदीचे दूध
हळदीचे दूध घशाची जळजळ आणि वेदना शांत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
ज्येष्ठमध
ज्येष्ठमध पावडर कोमट पाण्यात मिसळून गुळणी केल्याने घशाला चांगला आराम मिळतो.