protin Powder

मुलांसाठी घरीच तयार करा ‘हि’ प्रोटीन पावडर; आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत

583 0

पुणे: दूध म्हंटले कि लहान मुले नाक मुरडत असतात. त्यांना ते आवडत नसते. त्यामुळे पालक आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी अनेकदा हेल्थ ड्रिंक्स, प्रोटीन पावडर देत असतात. सध्या बाजारात ज्या प्रोटीन पावडर उपलब्ध आहेत त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आणि अस्वास्थ्यकर पदार्थ हे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे हे लहान बाळासाठी हानिकारक असते. त्यामुळे हे सगळे टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी प्रोटीन पावडर बनवून देऊ शकता. यामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य उत्तम राहू शकते. हि पावडर तुम्ही वर्कआउटच्या आधीच्या किंवा नंतरच्या जेवणात दूध किंवा शेकसह वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया हि पावडर बनवण्याची रेसिपी….

होममेड प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
100 ग्रॅम बदाम
100 ग्रॅम अक्रोड
100 ग्रॅम काजू
50 ग्रॅम पिस्ता
100 ग्रॅम ओट्स
1 कप मखना
1 कप दूध पावडर किंवा नारळाच्या दुधाची पावडर
तुम्ही शाकाहारी असाल तर दुधाच्या पावडरऐवजी शाकाहारी तांदूळ पेय पावडर देखील घालू शकता.
1/3 कप कोको पावडर
1/2 कप गूळ किंवा पांढरी साखर किंवा नारळ साखर

होममेड प्रोटीन पावडर बनवण्यासाठीची कृती
चॉकलेट फ्लेवर्ड प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये बदाम आणि काजू कोरडे भाजून घ्या. यानंतर ते एका भांड्यात थंड होण्यासाठी ठेवा. बदाम आणि काजूबरोबर अक्रोड, ओट्स, मखना आणि पिस्ता हेदेखील भाजून घेऊन काही वेळ थंड होऊ द्यावे. यानंतर हे सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये टाकून एकदा नॉर्मल बारीक करून घ्या. जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या. यानंतर तयार झालेली पावडर चाळणीने गाळून घ्या आणि खरखरीत पावडर वेगळी ठेवा. यानंतर आता पावडर चाळून घेतल्यानंतर त्या मिश्रणात गूळ पावडर, दूध पावडर आणि कोको पावडर एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या. यानंतर तुमची होममेड प्रोटीन पावडर तयार होईल. हि पावडर तुम्ही दुधात मिसळून पिऊ शकता. या पावडरमुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!