महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असतानाच महादेव जानकर यांनी मोठं विधान केलं आहे यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले महादेव जानकर?
मी इंजिनियर आहे, त्यामुळे मला माहिती आहे.. ईव्हीएम हॅक करता येतं. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. त्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमममुळे देशातली लोकशाही धोक्यात असल्याची आमची भूमिका आहे. बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी जानकरांनी केली.