Gyan Mudra

Memory : रागीट स्वभाव असेल तर ‘हा’ उपाय करून पहा; स्मरणशक्तीमध्ये होईल वाढ

963 0

रागीट स्वभाव आणि स्मरणशक्तीचा (Memory) अभाव असणाऱ्या व्यक्तींना जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे दोष दूर करण्यासाठी ‘योगासन’ हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. यासाठी काही मुद्रा खूप लाभदायक असून त्या नियमित केल्यास आपल्या आयुष्यात चांगलाच फरक पडतो. या मुद्रा कशा कराव्यात व त्यापासून कोणते लाभ होतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे…

ज्ञान मुद्रा
आसन अंथरून शक्यतो पद्मासन किंवा सुखासनात बसावे. 5-10 दीर्घ श्वास घ्यावेत आणि हळूहळू सोडावेत. त्यानंतर शांत चित्ताने (Memory) बसून पुढील मुद्रा दोन्ही हातांनी कराव्यात. या मुद्रेचे नाव ज्ञान मुद्रा असे आहे. तर्जनी अर्थात पहिले बोट वाकवून त्याच्या टोकाला अंगठ्याच्या टोकाचा स्पर्श करावा. बाकीचे तिन्ही बोटे सरळ ठेवावीत.

हे होतील फायदे
अनिद्रा, अतिनिद्रा, कमजोर स्मरणशक्ती (Memory), रागीट स्वभाव यांच्यासाठी ही मुद्रा अत्यंत लाभदायक आहे.ही मुद्रा केल्याने पूजा-पाठात, ध्यान-भजनात मन लागते.

Share This News
error: Content is protected !!