Hemoglobin

Hemoglobin : हिमोग्लोबीन कमी झालंय? तर ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

843 0

शरीरात हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. एनीमीया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. शरीरातील पेशींना सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजन आणि रक्ताची आवश्यकता असते. ऑक्सिजन आणि रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिनचे असते. शरीरात हिमोग्लोबीन कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात.

यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.शरीरात हिमोग्लाबिनची कमतरता असल्यास आहारात केवळ आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे पुरेसे नाही. आहारातील आयर्न घटक रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. याकरिता किवी, पपई, संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू अशा पदार्थांचा मुबलक समावेश करणं आवश्यक आहे.

कोणते पदार्थ टाळावे?
आपण दिवसभरात अनेक वेळा फास्ट फूड खातो. ज्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर पाहायला मिळतो. ब्रेड, पिझ्झा, रोल, सँडविच, चिकन, चीज, अंडी, आमलेट यासारख्या पदार्थांमध्ये सोडियम जास्त प्रमाणात उपलब्ध असते. पिझ्झा, सँडविच, बर्गर, चीज यांसारख्या पदार्थांपासून लांब राहिले पाहिजे. तुम्ही अंडी , सूप, चिकन यांसारखे हेल्दी फूड कमी प्रमाणात खाऊ शकता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!