तुम्हीही चहाप्रेमी आहात का ? पण दिवसभरात किती चहा प्यावा हे देखील जाणून घ्या ! अन्यथा शरीरावर होतील घातक परिणाम…

786 0

चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. असे अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोक असावेत की ज्यांना चहा आवडत नाही. तर अनेकजण कॉफीचे देखील चहाते आहेत. पण आज आपण चहाप्रेमींच्या व्यसनाविषयी बोलणार आहोत.

हो… चहा आपल्याला ताजतवानं करतो, ताण कमी करतो… हे अगदी बरोबर आहे. तुम्ही थकले असाल तर चहा घेणं सामान्य गोष्ट आहे. पण अनेकांना दिवसभरातून अगदी आठ ते दहा कप चहा पिण्याची सवय असते. घरी , ऑफिसमध्ये, परावासादरम्यान असं कुठे ना कुठे चहा होतच राहतो. म्हणून तुम्हाला माहित आहे का ? की चहा हे तोपर्यंतचं औषध रुपी मानले जाते जोपर्यंत तुम्ही त्याचे सेवन प्रमाणात करत आहात.

अर्थात दिवसभरात तुम्ही केवळ दोन ते जास्तीत जास्त तीन वेळा चहा घेतला, तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. पण यापेक्षा अधिक वेळा चहा दिवसभरात घेत असाल तर सावध व्हा. कारण यामुळे बद्धकोष्ठता ,छातीत जळजळ होणे, आतड्यांवर वाईट परिणाम होणे ,आम्लपित्त ,उच्च रक्तदाब, निद्रानाश अशा समस्या उद्भवू शकतात.

त्याचबरोबर चहामध्ये आपण किती साखर घेत आहोत याचा देखील चांगला वाईट परिणाम शरीरावर दिसून येतो. तुम्हाला जर फिट राहायचे असेल तर चहातील साखर कमी करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!