अन्य

पावसाळ्यात मीठ,साखर यांसारख्या पदार्थांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स

पावसाळा हा खुप लोकांचा आवडता ऋतू असतो. पावसांच्या रिमझिम धारांमध्ये भिजणे असो किंवा पावसात गरमागरम भजी खाण्याचा अनुभव असो,या गोष्टींचा अनुभव खुप वेगळाच असतो.पण पावसाळा आला की, बऱ्याच गोष्टींच्या समस्या निर्माण होतात.मग ते तुमचे कपडे सुकवण्यापासून तर घरात असलेले पदार्थ टिकवण्यापर्यंत तुम्हाला कसरत करावी लागते. तर आज आपण साखर,मीठ तसेच बाकी काही पदार्थांची कशी काळजी घ्यायची हे बघणार आहोत.              पावसाळ्यात कुठल्याही पदार्थाला खूप लवकर बुरशी चढते. म्हणून बायका पापड,लोणची यांसारखे पदार्थ उन्हाळ्यातच बनवून ठेवतात. पावसाळ्यात साखर आणि मीठ या पदार्थांची विशेष काळजी घ्यावी लागते. हे पदार्थ दमट वातावरणामुळे ओलसर होतात. त्यामुळे खालील टिप्स फॉलो करू शकता.

काचेच्या बरणीचा वापर करा

पावसाळ्यात साखर व मीठ काचेच्या बरणीमध्ये ठेवा. प्रत्येक वेळेस साखर घेताना सुक्या हातांनी घेत जा किंवा चमचाचा वापर करा.त्यामुळे साखरेला ओलावा सुटणार नाही.

हवाबंद डब्याचा वापर करा

तुमच्याकडे जर काचेची बरणी नसेल तर स्टीलच्या डब्याचा वापर करू शकता. पण त्या डब्याचे झाकण हे गच्च असले पाहिजे, त्यात हवा गेली नाही पाहिजे. हवाबंद डब्यांचा वापर केल्यास साखर व मीठ हे पदार्थ ओलसर होणार नाहीत.

साखरेमध्ये लवंग टाका

साखरेमध्ये 3-4 लवंग टाकल्यास साखर ओलसर होणार नाही तसेच लवंग टाकल्यामुळे मुंग्या सुद्दा होत नाहीत.

मिठाच्या बरणीत तांदळाचा उपयोग करा

मिठामध्ये थोडे तांदूळ चुरगाळून टाकल्यास मिठातील ओलसरपणा नाहीसा होतो.

साखर व मिठाबरोबरच पापड, चिप्स, बिस्कीट या पदार्थांनासुद्धा ओलसरपणा सुटतो. त्यामुळे या पदार्थ्यांच्या डब्यांत ब्लोटिंग पेपरचा वापर करा तसेच पापडांना काही दिवसाच्या अंतरावर पंखा लावून पसरवून ठेवा किंवा कधी उन्हात वाळवू घाला.असे केल्याने पापडांना बुरशी चढणार नाही. अशा प्रकारे पावसाळ्यात पदार्थ ओले तसेच बुरशी चढण्यापासून वाचवू शकता.