अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला तर “ही”प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली “मी मतदान करू शकत नाही”

453 0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटी मतदानासाठी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. पण मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर यावेळी मतदान करू शकत नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती देत महाराष्ट्रातील लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

मिथिला पालकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “मी यावेळी मतदान करू शकत नाही, कारण दुर्दैवाने वेळ योग्य नाही. पण महाराष्ट्र, कृपया तुम्ही नक्की मतदान करा.” ती मतदान का करु शकात नाही याचं कारण तिने सांगितल नसून तिच्या आधीच्या स्टोरीवरून असं दिसतं की ती सध्या नॉर्वेमध्ये आहे, त्यामुळे ती मतदानासाठी बाहेर आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलं आहे. अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, हेमंत ढोमे, सायली संजीव, प्रिया बापट, उमेश कामत आणि मनवा नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि इतरांना देखील मतदान करण्याचं सल्ला दिला आहे.


Share This News
error: Content is protected !!