Welcome 3

Welcome 3 : संपूर्ण बॉलिवूड एकाच ठिकाणी ! ‘वेलकम 3’ चा टीझर रिलीज

810 0

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिल आहे. वाढदिवसानिमित्त त्यांने त्याच्या मोस्ट अवेटेड कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘वेलकम 3’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘वेलकम’ हा बॉलिवूडमधील टॉप कॉमेडी चित्रपट आहे ज्याच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांनी खुप प्रेम दिलं आहे. आता पुन्हा अक्षय कॉमेडीचा डोस घेवुन आला आहे मात्र यावेळी त्याच्यासोबत पुर्ण बॉलिवूडची पलटण असणार आहे.

‘वेलकम टू द जंगल’ हे या चित्रपटाचे टायटल आहे. मात्र या चित्रपटात प्रेक्षकांना आणखी एक धमाका पहायला मिळणार आहे. तो म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडनची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवीना आणि अक्षय 19 वर्षांनंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्याशिवाय दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लीव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांसारख्या दिग्गज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!