आयफा अवॉर्ड्समध्ये विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

344 0

 

बॉलिवूड दुनियेतील आयफा अवॉर्ड्सला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. यावेळी अनेक कलाकारांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल सन्मानित केले जाते. दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात यंदाही अनेक बॉलिवूड कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अभिनेता विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले.

विकी कौशलने ‘सरदार उधम’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली आणि त्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला.
याप्रमाणे अभिनेत्री कृती सेनॉनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘शेरशाह’ चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णू वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देण्यात आला. मराठी अभिनेत्री अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘मिमी’ या चित्रपटात चांगल्या कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. यांच्यासह अनेक इतर कलाकारांना यावेळी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!