Munnawar Rana

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

743 0

लोकप्रिय उर्दू शायर मुन्नावर राणा (Munnawar Rana) यांचं रविवारी रात्री उशीरा निधन झालं. मुन्नावर राणा हे किडनीचा आजार, डायबिटीज आणि ब्लड प्रेशरने त्रस्त होते. अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना गुरूवारी लखनऊच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. तब्येत ढासळत असल्यामुळे त्यांना व्हॅन्टिलेटरही लावण्यात आला. तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पीजीआयमध्ये भरती केलं गेलं. त्या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुन्नावर राणा यांच्याविषयी बोलायचे झाल्यास 2014 साली शाहदाबा या कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. 26 नोव्हेंबर 1952 साली मुन्नावर राणा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये झाला होता, पण त्यांचं बहुतांश आयुष्य पश्चिम बंगालच्या कोलकात्यामध्ये गेलं.71 वर्षांचे मुन्नावर राणा मागच्या बऱ्याच महिन्यांपासून आजारी होते. लखनऊच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. राणा यांना उर्दू साहित्य आणि कवितेतल्या त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. मुन्नावर राणा त्यांच्या कविता आणि शायरीमध्ये अनेकवेळा फारसी आणि अरबी शब्दांऐवजी हिंदी आणि अवधी शब्दांचा वापर करायचे, जे भारतीय श्रोत्यांना आवडायचं. मुन्नावर राणा यांची मां ही कविता फारच लोकप्रिय झाली होती.

विविध पुरस्कारांनी सन्मानित
मुन्नावर राणा यांना अमीर खुसरो पुरस्कार, मीर तकी मीर पुरस्कार, गालीब पुरस्कार, डॉ.झाकीर हुसैन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं होतं. मुन्नावर राणा यांच्या अनेक रचनांचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद केला गेला. मुन्नावर राणा यांच्या मुशायरांना फक्त भारतातलेच नाही तर परदेशातले प्रेक्षकही यायचे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!