Tiger 3

Salman Khan : सलमान खानला सर्वात मोठा झटका,’टायगर 3′ वर ‘या’ देशांनी घातली बंदी!

708 0

मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. सध्या या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु आहे. यामध्ये सलमाननं ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मागे टाकलं आहे. ही चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र यादरम्यान एक वाईट बातमीदेखील समोर आली आहे. यामध्ये ‘टायगर 3’ प्रदर्शनाच्या आधीच दोन देशांमध्ये बॅन करण्यात आला आहे.

सलमान खानच्या ‘टायगर 3’ ला ओमान आणि कतारसारख्या देशांमध्ये बॅन करण्यात आलं आहे. बॅनमुळे इस्लामिक देशांमध्ये आणि त्या लोकांना निगेटिव्ह म्हटलं जातं आहे. या दोन देशांमध्ये ‘टायगर 3’ ला बॅन केल्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर होणार आहे. यावेळी निर्मात्यांचे कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

‘टायगर 3’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास सलमान खानच्या ‘टायगर 3’ ची निर्मिती मनीष शर्मानं केलं आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी पुन्हा एकदा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची 2 लाख पेक्षा जास्त तिकिटं विकली आहेत. 5 नोव्हेंबर पासून ‘टायगर 3’ च्या आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार तीन दिवसात आगाऊ बूकिंग ही 8 कोटींच्या पार झाली आहे. 2 लाख 88 हजार 515 तिकिट बूक झाली आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!