आयफा अवॉर्ड्समधील बच्चन परिवाराच्या या विडिओला मिळत आहे भरभरून पसंती; पाहा व्हिडिओ

372 0

बॉलिवूड दुनियेतील आयफा अवॉर्ड्समधील गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. दुबई मध्ये नुकत्याच झालेल्या या सोहळ्याची चर्चा सध्या रंगली आहे. अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यास उपस्थित होते.

या सोहळ्यातील खास गोष्ट म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चनने ‘मचा मचा’ या गाण्यावर डान्स केला आहे. स्टेज खाली येऊन त्याने त्याच्या पत्नी ऐश्वर्याराय बच्चनसमोर डान्स केला आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि चाहते सुद्धा या व्हिडिओला भरपूर पसंती दर्शवत आहे. अभिषेक बच्चनला पाहून ऐश्वर्याने सुद्धा ताल धरला आहे. या जोडीचा धामाल डान्स पाहून प्रेक्षक देखील त्याचा आनंद भरभरून घेत आहेत. बच्चन परिवाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या देखील या सोहळ्यात दिसत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/CeZc1kTDEnY/?igshid=YmMyMTA2M2Y=

Share This News
error: Content is protected !!