मुंबई : मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Hussain) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. ते 66 वर्षांचे होते. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
आमिर रजा हुसैन यांच्याविषयी
आमिर रजा हुसैन यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी झाला. आमिर यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. त्यांना लहानपणीच अभिनयाची आवड लागली. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. आमिर राज यांनी ‘बाहुबली’ ‘आरआरआर’ या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
RIP @AamirRazaHusain 🌺🌺 pic.twitter.com/xJFzTwKgVA
— Rohit Bansal 🇮🇳 (@theRohitBansal) June 3, 2023
1984 रोजी त्यांचा ‘किम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच 2014 साली ‘खुबसूरत’ या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. या रोमॅंटिक सिनेमात ते सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि फवादसोबत (Fawad) झळकले होते. तसेच त्यांनी ‘कारगिल’ आणि ‘लीजेंड्स ऑफ राम’ या लोकप्रिय नाटकाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. आमिर यांनी जॉय मायकल, बॅरी जॉन आणि मार्कस मर्च सारख्या बड्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. आमिर रझा हुसैन यांच्या रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.