Photo Viral : ऐन सणासुदीमध्ये उर्फीने चढवला चांदीचा वर्ख ; मिठाईला कमी पडू नये म्हणजे झालं…

861 0

मुंबई : उर्फी जावेदने सोशल मीडियावर जर एखादा फोटो शेअर केला … तर आता नवीन काय ? असाच प्रश्न पडतो.  कशापासून ही ललना ड्रेस बनवेल याचा भरोसा नाही. आतापर्यंत सेफ्टी पिन ,ब्लेड ,काच ,गोणी आणि चित्रविचित्र ड्रेस घालून प्रसिद्ध होत राहणारी उर्फी जावेद हिने आता कमालच केली आहे. तिने थेट मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्ख आपल्या शरीरावर लावून फोटोशूट केले आहे.

उर्फी जावेदच्या या फॅशन सेन्सवर अनेक चित्र विचित्र कमेंट सही येत असतात . अगदी तिच्या कपड्यांप्रमाणेच पण विशेष म्हणजे उर्फी या सर्व कमेंट्स ना पॉझिटिव्हली घेते , हे तिच्या या व्हिडिओ मधून आपण पाहू शकतो .

हा व्हिडिओ बनवताना तिच्या अंगावर वाईट कमेंट्स आणि तिच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरून तिला ज्या पद्धतीने लोक वाईट भाषेत बोलतात, त्यानुसार तिच्यावर केली जाणारी दगडफेक अशी कल्पना करून या दगडांपासूनच तिने एक ड्रेस देखील बनवला असल्याचा व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. शोभेचे पारदर्शक काचेचे दगड यांपासून तिने एक ड्रेस बनवला आहे . हा व्हिडिओ देखील चांगला व्हायरल झाला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!