Trininad Rao

धक्कादायक! JR नाना पाटेकरचा FB Live करत आत्महत्येचा प्रयत्न

4480 0

मुंबई : द कपिल शर्मा (The Kapil Sharma) शोमधील अभिनेता तीर्थानंद (Tirthanand Rao) याने फेसबुक लाइव्ह (FB Live) करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. त्याने हातात फिनाइलची बाटली घेऊन फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान फेसबुक लाईव्ह पाहत असलेल्या काही मित्रांनी जवळच्या पोलीस स्थानकात फोन करून पोलिसांना तीर्थानंदच्या घरी पाठवलं. यानंतर पोलिसांनी तातडीने तीर्थानंदच्या घरी धाव घेतली. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अभिनेता तीर्थानंदननं त्याच्या या परिस्थितीला एका महिलेला जबाबदार धरलं आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांआधी माझी एका महिलेबरोबर ओळख झाली होती. तिला दोन मुली होत्या. आम्ही लिव्ह-इनमध्ये राहत होते. एकत्र राहत असताना मला कळलं की ती वेश्याव्यवसाय करते. त्यामुळे मला तिच्यापासून सुटका मिळवायची होती. ती महिला मला धमकावत होती. तिने माझ्यावर केसही केली होती. त्या केसमुळे मी कित्येक दिवस माझ्या घरापासून दूर पळत होतो. मी अनेक दिवस माझ्या घरी गेलो नाहीये. तिने मला रस्त्यावर झोपण्यासाठी मजबूर केलं. या सगळ्याला मी वैतागलो आणि म्हणून स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला असे त्याने फेसबुक लाईव्ह मध्ये म्हंटले आहे.

अभिनेता तीर्थानंद सिने इंडस्ट्रीतील ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून ओळखला जात होता. सोशल मीडियावर त्याचं ऑफिशअल नावही ज्युनिअर नाना पाटेकर असं आहे. अनेकदा त्याने नाना पाटेकर यांच्या बॉडी डबलचंही काम केलं आहे. तीर्थानंदने याअगोदरदेखील 27 डिसेंबर 2021मध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांला त्वरित रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!