Thalapathy Vijay

Thalapathy Vijay : थलापती विजयने मोडला शाहरुखचा रेकॉर्ड! ‘Leo’ने परदेशात रचला ‘हा’ विक्रम

857 0

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये ‘थलापती विजय’ची (Thalapathy Vijay) गणना होते. त्याचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्याच्या फॅन्ससाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. थलापतीच्या ‘लियो’ (Leo) या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाने रिलीजआधीच नवा विक्रम रचला आहे. याबाबतीत थलापती विजयने शाहरुखचा रेकॉर्ड मोडला आहे.

थलापती विजयचा ‘लियो’ हा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमाची जगभरात चांगलीच क्रेझ आहे. ‘कैथी’ आणि ‘विक्रम’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या लोकेश कनगराज यांनीच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. काही दिवसांपूर्वी भारतात या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. भारतापाठोपाठ परदेशातही या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली.

‘लियो’ हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यूकेमध्ये या सिनेमाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग चांगलच होत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशीच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. त्यामुळे यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय सिनेमा ‘लियो’ ठरला आहे. लियो या सिनेमात विजय आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासह त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Share This News
error: Content is protected !!