Bollywood : कंगना राणावतच्या ‘Emergency’ या चित्रपटाचा First Look रिलीज ; चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता

364 0

Bollywood : कंगना म्हंटल की वाद आलाच. सतत वादग्रस्त वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणुन ओळखली जाते. अशा या बॉलीवूड क्वीन ने ‘एमरजन्सी’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भुमिका साकारली असुन,कंगनाने चित्रपटाचं टिझर सोशल मीडिया अकॉउंटवर शेअर केलं आहे.या चित्रपटात कंगनाच्या नव्या लुकला चाहते खुप पसंद करत आहेत.

कंगना राणावत अगदी निर्भीडपणे तिचं मत मांडत असते. मग ते राजकारण असो किंवा बॉलीवुडसंबंधी गोष्टी असो.तिच्या बोलण्यावरून नेहमी वाद होतात. कंगना ही खुप कमी अभिनेत्रीपैकी एक आहे जिचा चित्रपट स्त्रीप्रधान असतो.कंगनाच्या चित्रपटात अभिनेत्याचं काम खुप कमी असते .सगळा चित्रपट कंगनाच्या बळावर चालतात असे म्हंटल तरी हरकत नाही.

कंगनाने यापुर्वी पंगा, मणिकर्णिका,तनु वेड्स मनु या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.अशा या बॉलीवूड क्वीन ने ‘एमरजन्सी’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली असुन या चित्रपटाचं टिझर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगना राणावतने केलं असून रितेश शाह यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.

‘एमरजन्सी’ हा काळ इतिहासमधील 1975 ते 1977 या काळातील असून,तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सुरक्षा संकटात आहे असे सांगुन देशात आणीबाणी जाहीर केली होती.

Share This News
error: Content is protected !!