Sunny Deol

Sunny Deol : …अन् चाहत्यावर भडकला सनी देओल; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

479 0

नुकताच सनी देओल याचा (Sunny Deol) गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. गदर 2 मुळे सनी (Sunny Deol) सध्या चर्चेत आहे. सनीचा गदर [ एक प्रेम कथा ] हा सिनेमा 15 जून 2001 साली आला होता. गदर ने त्या वेळेस बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत 133 कोटी चा गल्ला जमवला होता. त्या नंतर आता 23 वर्षाच्या प्रातिक्षेनंतर सनीने कमबॅक केला आहे. चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत होते.

गदर 2 चित्रपटामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. नुकताच गदर 2 मधील अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो एका चाहत्यावर भडकलेला दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CvyqoKjOEo8/?utm_source=ig_embed&ig_rid=0f28f76b-0b3e-4a63-ae01-898c92c18b24

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा नेहमीच हसताना दिसतो. तसेच तो कधी कधी भावूक झालेला देखील दिसतो. पण आता चाहत्यांनी त्याला रागवताना पाहिलं आहे. सनीचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सनीचा एक चाहता त्याच्याकडे सेल्फी घेण्यासाठी धावत येतो. सनीचा एक अंगरक्षक त्या चाहत्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण कसा तरी तो सनीपर्यंत पोहोचतो. जेव्हा तो सेल्फी काढतो तेव्हा सनी देओल त्याच्यावर ओरडतो. या प्रकारामुळे चाहत्यांनी सनीला सोशल मीडिया वर ट्रोल केलं आहे. एका चाहत्याने तर चक्क सनीला कमेंट च्या माध्यमातून सुनावले आहे. तो म्हणाला सर, ‘आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जनतेसोबत वागलात तर ते बरे दिसत नाही.’

Share This News
error: Content is protected !!