Viral Dance Video

Viral Dance Video : सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा गाण्यावर केला डान्स

2359 0

मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाचे एक वेगळे स्थान असते. अनेकजण या पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत असतात. असाच पावसाचा आनंद घेताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी गारवा गाण्यावर भन्नाट डान्स (Viral Dance Video) केला आहे. सध्या त्यांच्या या डान्सची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. या गाण्यावर डान्स (Viral Dance Video) करण्यामागचे कारणदेखील तेवढेच खास आहे.

Hardeek-Akshaya : रील लाईफ हिरोवर भारी पडला रिअल लाईफ हिरो; राणादा अन् पाठकबाई देखील झाल्या थक्क

आज ‘गारवा’ला या गाण्याला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णी – फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा डान्स केला आहे.गारवाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सोनाली – फुलवाने गारवाच्या ओळींवर सुंदर डान्स केला आहे . या दोघींच्या गारवा डान्सला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

Kajol : 31 वर्षाच्या करिअरमध्ये काजोलने पहिल्यांदाच मोडली ‘ती’ पॉलिसी; म्हणाली ‘लोक काय म्हणतील….

सोनाली – फुलवाने शिवाजी पार्कला समुद्राच्या ठिकाणी जी नवीन जागा बांधली आहे त्या ठिकाणी हा डान्स (Viral Dance Video) केला आहे. या व्हिडिओत मागे बांद्रा – वरळी सी लिंक दिसतं आहे. सोनालीनं इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,या गाण्याच्या, अल्बमच्या गेली अनेक वर्ष प्रेमात आहोत… त्याचा गारवा आजही, तसाच जाणवतो, ताज़ा ताज़ा… थंडगार, आजही मनात गुदगुल्या होतात, अंगावर शहारे येतात… सध्या या दोघी जिवलग मैत्रिणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!