मुंबई : मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेत्री (Shruti Marathe) त्यांना आजवर कास्टिंग काऊच विषयी येणारे धक्कादायक अनुभव शेअर करताना दिसतात. त्यामध्ये आता एका मराठी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून श्रुती मराठे आहे. तिनेदेखील एका मुलाखतीमध्ये तिला आलेल्या कास्टिंग काऊच विषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
राधा ही बावरी मालिकेतून श्रुतीला घराघरात ओळख मिळाली. तसेच तिने आता ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतून निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं. श्रुती मराठेने नुकताच एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे जो ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.
काय म्हणाली श्रुती मराठे ?
‘मी एका चित्रपटाच्या निमित्ताने मी एका फायनान्सरला भेटले होते. चित्रपटाचं सगळं ठरलं. त्यांनी मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे? असं विचारलं. मी माझी फीस किती आहे ते त्यांना सांगितलं.’ ‘तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास, तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते नक्की देईन. आम्ही दोघंच तेव्हा चर्चा करत होतो आणि ती व्यक्ती मला तोंडावर असं बोलली होती…दोन ते तीन मिनिटांसाठी मी ब्लँक झाले होते.’ असा धक्कादायक खुलासा श्रुतीने केला आहे. ‘पुढे, काय बोलावं मला सुचत नव्हतं. मला घाम फुटला कारण, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. ती परिस्थिती नेमकी कशी हाताळायची याची काहीच कल्पना नव्हती. थोडा विचार करून मला जाणवलं या माणसाला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे.’यानंतर श्रुतीने आपल्या खास शैलीत त्या फायनान्सरला उत्तर दिले.
दिले सडेतोड उत्तर
यानंतर श्रुतीने ‘‘अच्छा…म्हणजे मी तुमच्याबरोबर झोपले, तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का?’ असं सडेतोड उत्तर दिलं. श्रुतीने सांगितलेला हा अनुभव ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम
Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे
Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा
Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!
Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं