Jawan Movie

Jawan Movie : बोंबला ! रिलीज होण्याच्या अगोदरच शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’चे क्लिप चोरीला

738 0

शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ हा चित्रपट (Jawan Movie) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची (Jawan Movie) आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान जवान चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या काही किल्प चोरीला गेल्या असून ऑनलाईन लीक झाल्या आहेत.अशी तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

माहिती प्रसारण तंत्रज्ञानाअंतर्गत मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. एफआयआरमध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंटने ‘जवान’ चित्रपटाच्या क्लिप चोरून कॉपीराइटचे उल्लंघन करून ऑनलाइन शेअर केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ लीक करणाऱ्या पाच ट्विटर हँडलची ओळख पटली असून त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. मात्र, केवळ एका ट्विटर अकाऊंटने ही नोटीस मान्य केली आहे.

‘जवान’च्या क्लिप ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी एप्रिलमध्येही दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ‘संशयास्पद’ वेबसाइट्स, केबल टीव्ही आउटलेट,थेट-टू-होम सेवा आणि इतर प्लॅटफॉर्मला ‘जवान’चे क्लिप लीक झालेले व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एटली यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखबरोबर नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा ​​आणि रिद्धी डोगरा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!