बॉलीवूड चा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या आगामी काळात येणाऱ्या ” जवान ” या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आगामी (Shah Rukh Khan) चित्रपटाचं पोस्टर आउट करत खानाने (Ask SRK) ‘आस्क एसआरके’ या कार्यक्रमात आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या भन्नाट प्रश्नांची त्याच्या हटके अंदाजात उत्तरे दिली आहेत.
Pehla sabak yeh ‘patana patana ‘ mat bolo accha nahi lagta. #Jawan https://t.co/tdXwkJC6Ue
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 10, 2023
‘आस्क एसआरके’ कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने शाहरुखकडे मुलगी पटवण्यासाठीच्या टिप्स मागितल्या. यावर उत्तर देत किंग खानने लिहिलं,”सगळ्यात आधी पटवणं बोलणं बंद करा.. ते ऐकायला चांगले वाटत नाही”. तर दुसऱ्या एका चाहत्याने विचारलं की,”जवान’ हा सिनेमा ऍक्शन व्यतिरिक्त कोणत्या कॅटेगरीत जाऊ शकतो”. यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,”भावनिक नाट्य”.
Emotional drama….#Jawan https://t.co/sWU3WDgi0F
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 10, 2023
‘या’ वेळेस असेल का SRK चा रोमँटिक मोड ?
एका चाहत्याने लिहिलं आहे,”एक व्यक्ती म्हणून शाहरुख तू मला आवडतोस? ‘जवान’ सिनेमात तुझा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळेल का?”. यावर मजेशीर उत्तर देत किंग खानने लिहिलं आहे,”सर्व बाजूंनी… समोरून… मागून… बाजूने… तुम्ही मला पूर्णपणे 3D IMAX वर्जनमध्ये पाहाल. काळजी करू नका”. शाहरुखच्या एका चाहत्याने सेशनदरम्यान लिहिलं आहे,”कृपया शिव्या दे पण उत्तर तरी दे”. यावर किंग खान म्हणाला,”तेरी बात का बैदा मारूं”. मी जॅकी
श्रॉफकडून हे शिकलो आहे”
किती भाषेत लाँच झाला आहे जवान चे पोस्टर?
जवान या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती एकाच फ्रेममध्ये दिसतील. शाहरुखने नवं पोस्टर शेअर करत खास कॅप्शनही लिहिलं आहे. ‘जवान’ हा बहुचर्चित सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.