Jail For Heart Emoji

Jail For Heart Emoji : सावधान ! महिलांना चॅटवर ‘हॉर्ट’ इमोजी पाठवताय? नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

339 0

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियावर लोक एकमेकांसोबत सहज जोडले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीसोबत सहज बोलता येते. एखाद्या व्यक्तीसोबत चॅट करताना (Jail For Heart Emoji) आपल्या भावना योग्यप्रकारे व्यक्त करण्यासाठी आपण इमोजींचा (Jail For Heart Emoji) मोठ्या प्रमाणात वापर करतो. कधी स्माईली, तर कधी हार्ट यासारखे इमोजी पाठवून आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. मात्र आता असं करणं गुन्हा मानला जात असून तुम्हाला त्यासाठी तुरुंगाची हवादेखील खावी लागेल.

सावधान ! महिलांना चॅटवर ‘हॉर्ट’ इमोजी पाठवताय?
जर तुम्हीही महिलांसोबत चॅट करताना त्यांना ‘हॉर्ट’ इमोजी पाठवत असाल तर, तु्म्हाला तुरुगांची हवा खावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवर महिलांना ‘रेड हार्ट’ इमोजी पाठवणे हा कुवेत आणि सौदी अरेबिया या ठिकाणी गुन्हा मानला जातो. त्यामुळे आखाती देशांमधील मुस्लिम देश कुवैत आणि सौदी अरेबियामधील महिलांना ‘हॉर्ट’ इमोजी पाठवल्यास तुम्ही अडचणीत सापडाल. असे केल्या तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

हॉर्ट इमोजी पाठवल्यास होईल ‘ही’ शिक्षा
जे हा कायदा मोडतील आणि दोषी आढळतील त्यांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीवर 2000 कुवेती दिनार म्हणजेच सुमारे 5.38 लाख रुपये दंडही ठोठावण्यात येईल असे कुवेतमधील वकील हया अल सलाही यांनी सांगितले आहे. तसेच सौदी अरेबियामध्ये जर कोणी महिलांना हार्ट इमोजी (Jail For Heart Emoji) पाठवताना पकडलं गेलं तर संबंधित दोषी व्यक्तीला दोन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय दोषी व्यक्तीला 1 लाख सौदी रियाल म्हणजेच 22 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

(टीप : हा नियम फक्त कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही.) 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!