Seema Haider

Seema Haider : सीमा हैदर ‘त्या’ शेजारणीवर दाखल करणार मानहानीचा खटला

757 0

पाकिस्तानी महिला सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची ‘लव्ह स्टोरी’ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. चार लेकरांची आई असलेल्या सीमा हैदरने आपल्या प्रियकरासाठी बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली. ऑनलाईन गेम ‘पबजी’च्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सीमा हैदरची शेजारीण मिथिलेश भाटी ही सचिनचा उल्लेख ‘लप्पू’ आणि ‘झिंगूर’ असा करत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीमा हैदरच्या वकिलाने शेजारीण महिला मिथिलेश भाटीवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. सीमाचे वकील एपी सिंग यांनी सांगितलं की, मिथिलेश भाटी यांनी सचिनबद्दल अपमानजनक टिप्पणी केली आहे.मिथिलेश भाटी यांनी प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये सचिनचा उल्लेख ‘झिंगूर सा’ आणि ‘लप्पू सा’ असा केला. या मुलाखतींनंतर, मिथिलेश रातोरात चर्चेचा विषय बनल्या. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढली. आता सीमाचे वकील एपी सिंह या वक्तव्याबद्दल मिथिलेश भाटी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!